Lonavala News : लोणावळ्यात जैन समाजाचा मूकमोर्चा; दुपारपर्यंत दुकाने ठेवली बंद

एमपीसी न्यूज : जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या सिध्दक्षेत्र श्री. सम्मेद शिखरजी, झारखंड या प्राचीन जैनक्षेत्र स्थळाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. (Lonavala News) तसेच श्री शत्रुंजय तीर्थ, सौराष्ट्र, गुजरात जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे तीर्थस्थळ, येथे काही असामाजिक तत्वांनी केलेल्या उपद्रवाचा निषेध नोंदविण्यासाठी आज जैन समाजाने भारत बंद पुकारला होता. 

लोणावळा, खंडाळा, वलवण येथील संघ प्रमुखांनी या बंदला पाठिंबा देत आज दुपारपर्यंत लोणावळा खंडाळा शहरातील सर्व दुकाने व व्यवहार दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवले. (Lonavala News) तसेच सकाळी 11 वाजता मावळा पुतळा चौकात एकत्र जमत तेथून लोणावळा शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषद पर्यत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

Pune News : खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू

जैन समाजाच्या भावना सरकारपर्यत पोहचविण्याची विनंती समाजाच्या वतीने दोन्ही प्रशासनाला करण्यात आली. मूकमोर्चात जैन समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यावसायिक व महिला भगिनी तसेच युवक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.