Kalapini : कलापिनी फिल्म क्लब मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व सिनेमटोग्राफर अविनाश अरुण यांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : कलापिनी सांस्कृतिक केंद्राच्या रंगवर्धन (Kalapini) प्रायोगिक मंच या उपक्रमांतर्गत “कलापिनी फिल्म क्लब” मध्ये यंदा सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

अविनाश हे तळेगावचेच सुपुत्र असून त्यांचे आई, वडील आणि बहीण यांची कार्यक्रमात उपस्थिती होते. त्यांचे स्वागत आणि परिचय पूजा डोळस यांनी केला. प्रास्तविका मध्ये डॉ. अनंत परांजपे यांनी चित्रपट या माध्यमाबद्दल त्यांचे विचार मांडले.

चैतन्य जोशी याने कलापिनी च्या या फिल्म क्लब विषयी सांगून पुढील वाटचालीबाबत माहिती दिली. सध्या गाजत असलेला “थ्री ऑफ अस” या चित्रपटाचे ते सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक असून या चित्रपटासाठी त्यांना 2024 चा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या फिल्म क्लब मार्फत चित्रपट ही अभ्यासण्याची गोष्ट आहे ही मानसिकता समाजात पोचवणे हा उद्देश्य आहे.

LokSabha Elections 2024 : अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी

अविनाश यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून मसान, दृश्यम, मदारी आणि (Kalapini) हिचकी या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे. त्यांच्या “किल्ला” या मराठी चित्रपटाला मार्च 2015 मध्ये 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा किताब मिळाला होता.

“कलापिनी फिल्म क्लब” मध्ये या प्रमुख अतिथींसोबत पूजा आणि चैतन्य यांनी अविनाश यांच्या कारकिर्दीविषयी संवाद साधला. चित्रपट हे लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचे अतिशय महत्त्वाचे माध्यम असून त्यात प्रयोग करीत राहणे आवश्यक आहे असे अविनाश म्हणतात.

तसेच फिल्म क्लबला शुभेच्छा देऊन प्रत्यक्ष प्रेक्षकांशी संवाद साधताना खूप आनंद झाला व समाधान वाटले असे अविनाश म्हणाले.

चित्रपट आणि त्याविषयीचे त्यांचे प्रगल्भ विचार जमलेल्या रसिक प्रेक्षक वर्गाला अतिशय प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमासाठी विराज सवाई, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, विनया केसकर, संदीप मनवरे, प्रणव केसकर, प्रतिक मेहता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असेच विविध नाट्य, चित्रपट क्षेत्रातील कार्यक्रम यापुढे होत राहतील अशी ग्वाही कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.