Kalewadi News : काळेवाडीतील कॅन्सर तपासणी शिबिरला महिलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – काळेवाडीत महिलांसाठी आज (बुधवारी, दि.30) मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचा 52 महिलांनी लाभ घेतला. लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड, प्रयास संस्था व काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात 30 ते 70 वयोगटातील 52 महिलांनी आपली तपासणी करून घेतली. यावेळी शिबिरामध्ये महिलांची जनरल तपासणी, स्तनांची सोनोग्राफी, गर्भाशय मुखाची तपासणी, सुरक्षित व एकांत ठिकाणी महिला तज्ञाद्वारे तपासणी, निर्धोक व वेदनारहित आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात आली.

वैद्यकीय अधिका-यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच तपासणीत कुणाला कॅन्सरचे निदान झाले तर पुढच्या सर्व आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत स्वरूपात करण्यात येतील, असा सल्ला व मार्गदर्शन केले.

यावेळी लोकमान्य हॉस्पिटलच्या तृप्ती धारपवार, सहदेव गोळे, सीमा कंद, योगिता थोरात, रुपाली गायकवाड, सिध्दी मुळक, कविता शेळके व काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे प्रवीण अहिर, प्रमोद हाटे, वैभव घुगे, बाबासाहेब जगताप, अमोल भोसले, अमित देशमुख, शारदा वाघमोडे, सीमा ठाकूर, आशा इंगळे व अनिल देसाई उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.