Kalewadi News : जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज-  रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला पाण्याचा (Kalewadi News) फुगा फेकून मारला. त्याचा जाब विचारला असता त्याला मारहाण केली. वाचविण्यासाठी आलेल्या वडिलांवर कोयत्याने वार केले. त्यानंतर तरुणावर देखील वार केले. ही घटना काळेवाडी येथे शनिवारी (दि. 4) रात्री सव्वानऊ वाजता घडली.

अभिषेक हौसराव बचाटे (वय 20, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Maharashtra News : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना 14 मार्च पासून बेमुदत संपावर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तापकीर चौक येथून काळेवाडीकडे त्यांच्या घरी पायी चालत जात होते. त्यावेळी रस्त्यात थांबलेल्या तीन अनोळखी तरुणांनी अभिषेक यांच्यावर पाण्याने भरलेला फुगा मारला. त्याबाबत अभिषेक यांनी तरुणांना विचारणा केली. त्यावरून आरोपींनी अभिषेक यांना बेदम मारहाण केली.

जवळच मामाच्या घरात बसलेले अभिषेक यांचे वडील भांडण सोडविण्यासाठी आले. आरोपींनी अभिषेक यांच्या वडिलांवर कोयत्याने वार केला. तेंव्हा अभिषेक मध्ये पडले असता आरोपींनी अभिषेक यांच्यावर देखील वार केले. दोघांना जखमी करून आरोपी दुचाकीवरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.