Kamshet : भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील स्विफ्ट कारची धडक बसून दूध घेऊन जाणाऱ्या सायकलस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.३१) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुणे- मुंबई महामार्गावर कामशेत जवळ घडला.

बंडु बारकु आंद्रे ( वय ५२, रा. नाणे ता. मावळ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी घटनास्थळी थांबलेले संदीप लालगुडे ( वय ३५ रा. नायगाव ) यांनी कारचा नंबर लिहून घेऊन अपघाताची माहिती कामशेत पोलीस ठाण्यात दिली.

कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि.३१) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर नायगाव गावच्या हद्दीत हॉटेल दिपासमोर मुंबई-पुणे लेनवर भरधाव वेगातील स्विफ्ट कारने ( क्र. एम एच १४ जी एच ६०२९) डेअरीवर दूध घालण्यासाठी सायकलवरून निघालेल्या बंडु आंद्रे यांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कारचालक घटनास्थळी न थांबता वाहनांसह फरार झाला. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.