Kamshet : द्रुतगती मार्गावर दोन अपघातामध्ये 2 ठार 6 जखमी

एमपीसी न्यूज- पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर आज, सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या अपघातामध्ये पुण्याहून मुंबईला कोंबड्या घेऊन निघालेल्या टेम्पोने एका वाहनाला पाठीमागून धडक दिली यामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले तर तीनजण थोडक्यात बचावले. वाहनामध्ये अडकलेल्या तीनजणांना सुखरुप बाहेर काढण्य़ात आलं आहे.

दुसऱ्या अपघातात रत्याच्या बाजुला उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोनजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, सोमवार पहाटे साडेपाचच्या सुमारास पिंपळोली गावाच्या हद्दीत कामशेत बोगद्याजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या बाजुला डंपर ( एम एच 16 ए वाय 8969 ) हा थांबलेला असताना मागील बाजुने भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा टीयुव्ही 300 ( एम एच 04 जी डी 9791 ) या मोटारीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डंपरवर पाठीमागून धडकून हा भीषण अपघात झाला.

यामध्ये महिंद्रा गाडीतील जावेद इस्माईल शेख ( वय 40) व इस्माईल शेख ( वय 65 दोघेहीरा. कुर्ला, मुंबई ) यांचा जागीच मृत्यू झाला असुन इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. त्यांना उपचाराकरिता निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकचा तपास कामशेत पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.