Mahalunge : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-  गती रोधकावरून जाताना गाडीवरील नियंत्रण ( Mahalunge ) सुटल्याने 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आंबेठाण येथे बुधवारी (दि.10) घडला आहे.

दिलीप गेणूभाऊ कदम (वय 53 रा.वासुली) यांचा अपघात मृत्यू झाला आहे.  याप्रकरणी ऋषिकेश शिवाजी बोंबले (वय 24) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Instagram Feature : इन्स्टाग्रामवर न्यूड कंटेंट पाठवल्यास होणार ब्लर; कंटेंट पहायचा की नाही याचा निर्णय युजर्सच्या हाती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काका दिलीप कदम हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना गतीरोधक ओलांडत असताना त्य़ांचे नियंत्रण  सुटले व गाडी घसरून खाली पडले. गाडी वेगात असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी  गुन्हा दाखल केला ( Mahalunge ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.