Karla: आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; आदित्य ठाकरेंनी घेतली शेळके यांची आवर्जून भेट!

एमपीसी न्यूज – कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा व मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

देवीच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदार शेळके यांची आवर्जून भेट घेतली. शेळके यांचा हात हातात घेऊन राज्याच्या विकासासाठी युवाशक्ती एकत्र काम करणार असल्याचा संदेश दिला. या दोन तरुण नेत्यांच्या भेटीचे फोटो काढण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.

HB_POST_END_FTR-A2
You might also like