Pune News : कर्नाटकातील भाजपच्या महिला नेत्याला पुण्यातून केली अटक, पाहा काय केलं? 

एमपीसी न्यूज : पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणात कर्नाटक राज्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.  दिव्या हागारगी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कर्नाटक पोलिसांनी यापूर्वीच या घोटाळ्याप्रकरणी 17 जणांना अटक केली होती. तर मुख्य आरोपी असलेली दिव्या फरार होती. 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिव्या या फरारी झाली होत्या. दरम्यान, सीआयडीच्या पथकाने त्यांच्या पतीला अटक केली आहे. त्यांची माहिती काढली जात असताना त्या पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कर्नाटकच्या सीआयडी पथकाने पुण्यातून अटक केली.

कर्नाटकाचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने भाजप नेत्या दिव्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. आरोपींनी अटकपूर्व जामीनासाटी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला. दिव्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्षा होत्या. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पक्षाने तिची हकालपट्टी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.