Chakan News : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जुन्या प्रियकराचा डोक्यात दगड घालून खून 

एमपीसी न्यूज – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जुन्या प्रियकराचा डोक्यात दगड घालून खून केला. 19 वर्षीय युवतीने आपल्या प्रियकरासोबत मिळून जुन्या प्रियकराचा काटा काढला. याप्रकरणी तीन जणांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून, 19 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. 28 ते 29 एप्रिल दरम्यान भांबोली, खेड येथे इलाईट कंपनी जवळील मोकळ्या जागेत ही घटना घडली. 

संजय वासुदेव पाटील (वय 40, रा. आगरकर वाडी, शिक्षक कॉलनी, चाकण) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी नेहा रोहीदास जाधव (वय 19, रा. आंबेठाण, खेड) हीला अटक करण्यात आली आहे‌. तर, प्रेम उघडे आणि प्रतिक उघडे (दोघेही, रा. भांबोली फाटा, चाकण) या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयत संजय पाटील यांची पत्नी प्रतिभा संजय पाटील (वय 40, रा. आगरकर वाडी, शिक्षक कॉलनी, चाकण) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेहा आणि प्रेम उघडे यांचे प्रेमसंबंध आहेत. या प्रेम संबंधात नेहा हिचा जुना प्रियकर संजय पाटील हा अडथळा ठरत होता. नेहाने आपला प्रियकर प्रेम आणि आरोपी प्रतिक यांच्यासोबत कट रचून, संजय पाटील यांना निर्जन स्थळी घेऊन जात डोक्यात दगड आणि सिमेंटची पाईप घालून निर्घृण खून केला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीला अटक केली असून, चाकण (म्हाळुंगे पोलीस) अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.