Kasarwadi : घरफोडी करून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातून चार लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम एक लाख रुपये असा एकूण पाच लाख 55 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शास्त्रीनगर कासारवाडी येथे शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

संदीप मंगेश नाईक (वय 43, रा. शास्त्रीनगर, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास फिर्यादी संदीप यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून संदीप यांच्या वडिलांच्या खोलीतील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातून 18.3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हा प्रकार शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही गाडी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.