Khadki Crime News : ज्येष्ठ महिलेच्या घरातून रोकड चोरणारा कामगार अटकेत

एमपीसीन्यूज : घरकामास ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठ महिलेच्या घरातून एक लाख वीस हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कामगाराला खडकी पोलिसांनी अटक केली.

विनीतकुमार बिल्टू साफी (वय २०,सध्या रा. रॉयल टॉवर सोसायटी, औंध रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेचे पती आजारी आहेत. पतीच्या उपचारासाठी त्यांनी एक लाख वीस हजारांची रोकड कपाटात ठेवली होती. आरोपी साफी त्यांच्या घरात घरकाम करतो. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्यची संधी साधून साफीने कपाटातील रोकड लांबविली होती.

ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात साफीने रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.