Khadki : अर्धांगवायू पुनर्वसन केंद्रातील जवानांसोबत इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज- खडकी येथील अर्धांगवायू पुनर्वसन केंद्रातील जवानांना इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

अर्धांगवायू झालेल्या सैनिकांना परिवारापासून विभक्त जीवन घालवावे लागते. खडकी येथे एका पुनर्वसन केंद्रात अशा सैनिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना सणाचा आनंद व्यक्त करता यावा, यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने हा उपक्रम राबविला. सर्व सदस्यांनी जवानांना राख्या बांधल्या.

रक्षाबंधन उपक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, मुक्ती पानसे, आरती मुळे, जयश्री कुलकर्णी, कमलजीत दुल्लत, स्मिता इळवे, प्रणिता आलूरकर, रो. अर्जुन दलाल, मुकुंद मुळे, हरबिंदर सिंग दुल्लत, तसेच अमेरिकेहून भारतात आलेल्या सचरी देखील उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.