Khed : ऊस जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दिड एकर रानातील (Khed) ऊस जाळून टाकल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडे सहा वाजता चिंचोशी, खेड येथे घडली.

याप्रकरणी राम पांडूरंग भोसकर (वय 23 रा. चाकण, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Talawade : क्रेनच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतातील काढणीला आलेला दिड एकर ऊस अज्ञाताने जाणीवपूर्वक जाळून टाकला आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.