Khed : राजगुरूनगर नगरपरिषदेतील अभियंता महिलेस लाच घेताना पकडले

एमपीसी न्यूज – राजगुरुनगर (Khed) नगरपरिषद येथील आरोग्य विभागात काम करणाऱ्या अभियंता महिलेला आठ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. अभियंता महिलेसह अन्य दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रमाचे आयोजन

चारुबला राजेंद्र हरडे (वय 31, पद – अभियंता आरोग्य विभाग (वर्ग-3), राजगुरूनगर नगरपरिषद, खेड), प्रवीण गणपत कापसे (वय 35, पद – लेखापाल (वर्ग 3), राजगुरूनगर नगरपरिषद,खेड), श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय 35, पद- मुख्याधिकारी, (वर्ग 2) राजगुरूनगर नगरपरिषद, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. त्यांना राजगुरुनगर नगरपरिषदेतील आरोग्य विभागात लागणारे साहित्य पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. साहित्य पुरविल्यानंतर त्यांचे 80 हजार 730 रुपयांचे बिल नगरपरिषदेकडून येणे बाकी होते. ते बिल काढून देण्याकरिता अभियंता महिला हरडे यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कार्यालयात बुधवारी (दि. 13) सापळा लावला. अभियंता महिलेला आठ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. अन्य दोघांनी अभियंता महिलेला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.