Talegaon : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

Khed : राजगुरूनगर नगरपरिषदेतील अभियंता महिलेस लाच घेताना पकडले

भालचंद्र अहिरकर (वय 35), अर्जुन शेळके (वय 40, दोघे रा. निगडी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, जुना पुणे मुंबई महामार्गावर मुंबई लेनवर सोमाटणे फाटा येथे कार (एमएच 12/व्हीके 8000) आणि मोपेड दुचाकीचा अपघात झाला कार आणि मोपेड दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये भालचंद्र आणि अर्जुन गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अपघात झाल्यानंतर सोमाटणे फाटा येथे मुंबई लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.