Khed : किरकोळ कारणावरून नातेवाईक तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून (Khed) तिघांनी मिळून नातेवाईक तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली.

योगेश अनिल जाधव (वय 21, रा. सावरदरी, ता. खेड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश विलास राठोड (वय 25), नारायण मधुकर चव्हाण (वय 25), कृष्णा उत्तम जाधव (वय 30, तिघे रा. निघोजे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची शहरात तयारी पूर्ण

पोलिसांनी (Khed) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांची चुलत बहीण कोठे निघून गेली आहे. त्यामुळे त्यांनी निलेश राठोड याला फोन करून विचारणा केली. त्यावरून त्याने फिर्यादीला बाहेर बोलावून घेत त्यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह त्यांचा चुलत भाऊ आकाश चव्हाण याला देखील धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.