Crime News: अपहरण करून मोबाईल व गाडी चोरली

एमपीसी न्यूज – अपहरण करून तरूणाचा मोबाईल व कार चोरल्याची घटना निगडी येथील पवळे ब्रीजजवळ रविवारी (दि.4) रात्री आठ वाजता घडली.

याप्रकरणी अशोक सोमचंद जाधव (वय 25 रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली असून चार अनोळखी इसामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे रविवारी रात्री त्यांचे नातेवाईक अविनाश राठोड, विष्णू राठोड, सुनिल चव्हाण व इंदल राठोड यांना गावी जाणासाठी ट्रॅव्हल्समध्ये बसवण्यास गेले होते. नातेवाईकांना बसमध्ये बसवून पार्क केलेल्या कारकडे जात असताना आरोपी तेथे आले व त्यांनी त्यांच्या स्कॉर्पिओसारख्या गाडीत बसवून घातपात करण्याच्या उद्देशाने पळवून नेले.

यावेळी आरोपींनी फिर्यादीचा 8 हजार रुपयांचा फोन घेतला व त्यांची पांढऱ्या रंगाची टुरीस्ट परमीट कार (एम एच 14 जी यु 9004) ही 3 लाख रुपयांची कार देखील जबरदस्ती घेऊन गेले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करती आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.