Pimpri Crime News : किरकोळ कारणावरून भावाचे अपहरण करून मारहाण; चुलत भावाला अटक

एमपीसी न्यूज – चुलत्यासोबत किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामुळे चुलत भावाने तरुणाचे अपहरण केले. चुलत भाऊ, त्याचा साडू आणि अन्य दोघांनी तरुणास मारून जखमी केले. ही घटना 8 डिसेंबर रोजी रात्री दत्तनगर, चिंचवड आणि दवबाजार ब्रिजवर, चिंचवड येथे घडली.

अविनाश शिवाजी गवळी (वय 28, रा. दत्तनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय नाना गवळी (वय 26, रा. आळंदनगर, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह विकी राठोड, त्याचे दोन अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश यांचे चुलते नाना गवळी यांच्यासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यावरून चुलत भाऊ आरोपी विजय आणि त्याचा साडू यांनी फिर्यादी यांना दुचाकीवर येऊन शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याच्या हेतूने फिर्यादी यांना दुचाकीवरून दवाबाजार येथील पुलावर नेले. तिथे विजय, विकी आणि अन्य दोघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या तोंडाचा जबडा फ्रॅक्चर केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.