Hinjawadi News : लाखो रुपयांची फसवणूक करत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – महिलेच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीने तिची 17 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 20 ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.

विजय अर्जुन साबळे (वय 55, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 41 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बेळगावकर (रा. गणपतीपुळे, रत्नागिरी) यांचे हॉटेल खरेदी केल्याचे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. तसेच भासवून फिर्यादी यांच्याकडून आरोपीने वेळोवेळी एकूण 17 लाख 82 हजार 600 रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली.

फिर्यादी यांच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी मिटिंग घेण्याच्या बहाण्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवतळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.