Bhosari News : व्यवसायात भागीदारी करून पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 29 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायात 50 टक्के भागीदारी करून पैसे मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एकाने ज्येष्ठ नागरिकाची 28 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2016 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.

रामचंद्र ज्ञानोबा पवार (वय 64, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सयाजी विठ्ठल भराडे (रा. मॅगझीन चौक, दिघी. मूळ रा. भराडेवस्ती, ता. खटाव, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी याने फिर्यादी यांना त्यांच्या आदित्य ऍग्रो टेक इंडस्ट्रीज मध्ये 50 टक्के भागीदारी करण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना पैसे मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी रोख, चेक, आरटीजीएस आणि सोन्याच्या दागिन्यांच्या स्वरूपात एकूण 28 लाख 91 हजार रुपये घेतले. त्या रकमेचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मोहारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.