Kiwale News : प्रभाग16 वर भाजपचाच झेंडा फडकणार : बाळासाहेब ओव्हाळ

एमपीसीन्यूज : किवळे-विकासनगर परिसरात भाजपला मानणारा वर्ग आहे. मात्र, संघटनात्मक ताकद थोडी कमी पडत होती. आज महिलांचे संघटनात्मक जाळे मजबूत झाले आहे. भाजपचे महिला बचतगट आणि महिला मोर्चाच्या ताकदीच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत येथील दोन्ही नगरसेवक भाजपाचेच निवडून येतील , असा विश्वास स्थानिक नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केला.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महापालिका प्रभाग क्रमांक 16 चे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओहाळ, चिंचवड -किवळे मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, प्रभाग महिला मोर्चा अध्यक्षा निशा येवले यांच्या अध्यक्षतेखाली महिला मोर्चाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.

प्रभाग 16 भाजप महिला मोर्चाच्या नवीन कार्यकारणीत सरचिटणीसपदी चंद्रिका राम कनक, रेश्मा पाटील, संगीता नितीन कुवर, तबस्सुम किल्लेदार यांची नियुक्ती करण्यात आली. तर सुवर्णा तरस, निवेदिता पाटील, शुभांगी सुतार यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.नवनियुक्त्त महिला पदाधिकाऱ्यांचा पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

भाजप शहर संघटक अमोल थोरात, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, चिंचवड मंडळाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, स्वीकृत नगरसेवक बिबीशन चौधरी, भाजप शहर उपाध्यक्ष सुरेश नायर, भाजप प्रभाग 16चे अध्यक्ष रोहित ओव्हाळ, युवा मोर्चाचे अध्यक्ष मनोज थोरवे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. पुरोहित, गौतम रामोशी, मंगेश पोडाला, रोहित सरनोबत आदी उपस्थित होते.

यावेळी नामदेव ढाके, अमोल थोरात यांनी मनोगत व्यक्त करीत महिला मोर्चाच्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी प्रभाग क्रमांक 16 मध्ये केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

आभार राजाभाऊ ओव्हाळ यांनी मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.