Pune : आणि कोंढवा पोलिसांनी विद्यार्थ्यांला दिले पोटभर जेवण

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन झाल्यापासून जसे वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कारवाई करताना दिसत आहेत तसेच खाकी वर्दीतील पोलिसांची माणुसकी दर्शवणारे काही प्रकारही समोर येत आहेत.

रात्रगस्त घालत असताना व्हीव्हीआईटी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याला कोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांनी पोटभरून जेवण देऊ केले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोंढवा परिसरात राहणारा हा विद्यार्थी शुक्रवारी (दि.27) रात्री दहा वाजता जेवण करण्यासाठी पैसे नसल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे आला.

त्यांनी पोलिसांना पैसे नसल्याचे सांगितले आणि पोलिसांनी स्विगी या ऑनलाइन फूड डिलिव्हरी च्या माध्यमातून जेवण मागवले आणि त्या विद्यार्थ्याला देऊ केले.

तसेच त्याला पुढील आठ ते दहा दिवस पुरेल एवढे राशन उपलब्ध करून दिले. त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.