Kothrud : अवैध सावकारी करणाऱ्या सावकारास बेड्या

एमपीसी न्यूज – अवैधरित्या सावकारकी (Kothrud) करणाऱ्या सावकारास खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. संबधीत सावकार हा 10 टक्के व्याजाने कर्ज देत होता. संदिप दत्तात्रय भगत (वय 36 वर्ष रा.पौडरोड, कोथरूड) असे अटक सावकाराचे नाव आहे.

Bhosari Crime: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाकडे संबंधित सावकाराची तक्रार आली होती. त्यानुसार सावकाराने फिर्यादी यांना सप्टेंबर 2019 रोजी दहा टक्के व्याजाने 1 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. यावेळी भगत याने व्याजाचे 10 हजार रुपये कपात करून 90 हजार दिले होते. त्यानंतर परतफेड म्हणून फिर्यादीने तीन लाख दहा हजार व 4 हजार रुपये दंड दिला होता. तरी भगत याने फिर्यादीच्या दोन दुचाकी ठेऊन घेऊन 70 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी फिर्यादी याने पोलिसांकडे तक्रार केली असता पुणे शहर खंडणी विरोधी पथक -2 यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. याचा पुढील तपास कोथरूड (Kothrud) पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.