Bhushi Dam : भुशी धरणाचा रस्ता सायंकाळी 5 नंतर बंद

मपीसी न्यूज – लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 213 मिमी पावसाची (Bhushi Dam) नोंद झाली आहे. तर, आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान तब्बल 170 मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील 24 तासात लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा कंपनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिला आहे.

Pune School News : अतिवृष्टीचा इशारा! पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी

नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, भुशी धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वहात असल्याने पर्यटकांनी धरण क्षेत्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. भुशी धरणाकडे (Bhushi Dam) जाणारा मार्ग आता दररोज सायंकाळी 5 वाजता बंद करण्यात येणार असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.