Pimpri Corona Update: शहरात आज 238 नवीन रुग्णांची नोंद; 284 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 238 नवीन कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 284 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 64 हजार 668 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 350 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 297 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Bhushi Dam : भुशी धरणाचा रस्ता सायंकाळी 5 नंतर बंद

तर, 53 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 62 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 76 हजार 709 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.