Municipal Council Elections 2022 : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी सोडत पद्धतीने महिला आरक्षणाची जाहीर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Municipal Council Elections 2022) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि. 13) पार पडली. ओबीसी आरक्षणाची सोडत नसल्याने उपस्थितांमध्ये उलट सुलट चर्चा रंगली. 14 प्रभागातील 28 सदस्यसंख्या असलेल्या या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी 13, सर्वसाधारण महिला 12, अनुसूचित जाती महिला 1, अनुसूचित जमाती महिला 1, अनुसूचित जातीसाठी 1 असे आरक्षण पडले आहे.

नगर परिषदेच्या सन 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता (Municipal Council Elections 2022) एकूण चौदा प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये 2 सदस्य असल्याने 28 होत आहे.यामध्ये सोडती व्दारे प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती महिला 1, प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जमाती महिला 1 तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुसूचित जातीसाठी 1, राखीव झाले आहेत.

Todays Horoscope 14 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या एकूण 14 प्रभागात सर्व साधारण महिलांसाठी 12 जागा, सर्वसाधारण गटासाठी 13 जागा तर अनुसूचित जाती महिला 1 अनुसूचित जमाती महिला 1 अनुसूचित जातीसाठी 1, या प्रमाणे 28 सदस्यांची वर्गवारी करण्यात आली आहे.

सरदार अजितसिंह दाभाडे सरकार व्यापारी संकुलात सोमवारी रजनी जितेंद्र म्हापूसकर व श्वेता अजय कांबळे या विद्यार्थ्यीनींच्या हस्ते आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपजिल्हाधिकारी अजय पवार व उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदे प्रशासनाकडून उपस्थित होते तसेच तळेगावातील आजी माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसीचे आरक्षणाची सोडत नसल्याने सर्वसाधारण जागांची संख्या वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.