Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात तूळ राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. तूळ राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

तूळ : जागेची कामे यशस्वी होतील

राशी चक्रातील ही सातवी राशी असून या राशीचा स्वामी शुक्र हा आहे. पुरुष स्वभावी चरवृत्ती, वायू तत्वाची रास असून या राशीचे चिन्ह समान दोन तराजू आहे. या राशीच्या व्यक्ती उत्साही असून रूप, सौंदर्य व रसिकता यांचा आस्वाद घेणारी आहे. वागण्यात एकवाक्यता असते.

आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:चा तर्क-वितर्क लावून न्यायाने ते काम पूर्ण करतात. नाटक, सिनेमा, रंगभूमी, नृत्य, कयव्य हे तूळ राशीस आवडते क्षेत्र आहे. तूळ राशीत असणारे व्यक्ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव जीवन कसे जगावे हे तूळ राशीच्या कडून शिकावे.

सर्वांच्याबरोबर मिळून मिसळून वाढणारा मधुर व्यक्तीमत्व न्याय विषयी आवड व सर्वाबरोबर मिळते जुळते घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते सर्व नाच प्रिय ठरतात. निसर्गाचे खरे रसिक असतात. आपल्या सौंदर्याची अभिरूची ही अभिजित असते.

मूळात केवळ पैसा व संपत्ती हे आपले ध्येय असत नाही. जीवनातील निसर्गातील साहित्यातील, सौंंदर्य आपण रसिकतेने टिपता. त्याचा खरा खुरा आनंद आस्वाद घेता.

तरल संवेदना व मनस्वी स्वभाव या गोष्टी आपणास जन्मजात घटनेत विचारात व प्रसंगात अटीतटीची भूमिका न घेणे दुराग्रही वृत्ती न ठेवणे. हा आपला स्वभावाचा मूळ गुण असतो. तर स्वातंत्र्य, समानता, समता, न्याय व बंधूभाव ही  तत्वे आपल्यात भिनलेली असतात.

लोकशाहीवृत्तीचे अनुकरण आदर, दुसर्‍या व्यक्तीची प्रतिष्ठा संभाळल्याबद्दल आपले सर्वत्र स्वागत होते. तर तूळराशीमध्ये चित्रा, स्वाती व विशाखा ही नक्षत्रे येतात. तूळ रास चित्रा नक्षत्रामधील व्यक्ती पराक्रमी,साहसी, बलवान व उत्साही, आर्थिक बाबतीत ज्येष्ठ, बलवान, गणित विषय हा चांगला असते. पारख चांगली असते.

गूढशास्त्राची आवड तर तूळरास स्वामी नक्षत्राची व्यक्ती शांत व्यापारी वृत्तीची, कृपाळू, मधूरवचनी शांतताप्रिय आनंदी, ईश्‍वरभक्त, संयमी, नितीमान, सत्यप्रिय असून आत्मसंयमी, विद्वान, चंचल व तडजोड करणारी असते.

तूळरास विशाखा नक्षत्रातील व्यक्ती चिडखोर, रसिक काही प्रमाणात उधळ्या व्यवहाराची रुची, आकर्षक, प्रभावशाली व्यक्तीमत्व काहीवेळा असूरी वृत्ती, बोलण्यात अत्यंत चतूर अशी व्यक्ती असते.

अशा तूळ राशीचे चालू वर्ष कसे राहील…

राशीचे चतुर्थ व पंचम स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असून घर/जागा/वाहन यांची खरेदी होईल. वास्तूमध्ये मोठे बदल होतील. घरात धार्मिक / मंगल कार्य होतील. घरातील वातावरण चांगले राहील. तरूण व्यक्ती हे वर्ष अनुकूल राहील.

विवाह इच्छुकांचे विवाह एप्रिल 2021 नंतर ठरतील. अथवा संपन्न होतील. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय होतील. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. घराजवळ बदली अथवा त्यासाठी प्रयत्न कराल. राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल.

वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वारसा हक्क/विमा/पेन्शनची कामे होतील. दूरवरचे प्रवास संभवतात. कर्जाची कामे सहज होतील. मात्र, विद्यार्थी वर्गाला कष्टातून यश मिळवावे लागेल.

तरुणांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. पाल्यांना आपल्या संततीचे कौतुक वाटेल. तर राशीच्या चतुर्थस्थानी शनिचे भ्रमण होत असून घर जागा, जुन्या घराचे पुननिर्माण होईल.

जागा/घरावरून कोर्टकचेरी / अथवा कायदेशीर कटकटी निर्माण झाल्या तरी त्यात यश आपलेच आहे.  राजकीय सामाजिक क्षेत्रात जरा जपून काम करावे. नोकरीमध्ये सहकार्याची मानहानी सहन करावी लागेल.

घरातील वृद्ध व्यक्तींची  दक्षता घ्यावी लागेल. दीर्घ मुदतीचे आजार या काळता दर्शवितात. दुखणे, मधुमेह यासारखे आजारांची वाढ होईल.

तर राहू केतूचे भ्रमण हे अष्टम व द्वितीय स्थानातून होत असून आरोग्याची दक्षता घ्यावी. प्रवास जपून करावे. एकत्र कुटुंबाची वाटणी / विभक्त होण्याचे योग येतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीसाठी हा काळ प्रतिकूल आहे. कौटुंबिक अडचणी वाढतील.

आर्थिक व्यवहार करताना जपून राहावे. दात, डोळे किंवा पायाची दुखणी संभवतात. नोकरी व्यवसायात खंड अथवा मन उदास होण्याची शक्यता राहील. तर हर्षल सप्तमस्थानी, पंचमस्थानी नेप्च्यून, चतुर्थ प्लूटो असून अचानक व अनपेक्षित गोष्टी या काळात संभवतात.

मित्रावर अतिविश्‍वास धोकादायक राहील. जुनी येणी येण्यास विलंब दर्शवितो. तर खेळाडू / साहित्यिक यांना हे वर्ष अनुकूल राहील.

उपासना : आपण कुलदेवी उपासना, महालक्ष्मी उपासना उत्तम राहील. त्याचबरोबर काळे उडीद, सप्तधान्य दर शनिवारी दान केल्यास अनुकूल राहील.

शुभरंग : जांभळा / पांढरा

भाग्यकारक रत्न : आपण पाचू, तूरमळी, ओपल, डायमंडळचा वापर केल्यास उत्तम राहील.

शुभ दिनांक : कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24

भाग्यकारक वयोवर्ष : 16, 25, 28, 32, 40, 47, 62.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.