Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. कन्या राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

कन्या : पदवी पुरस्कार प्राप्त होईल

राशीचक्रातील सहावी रास असून आपला राशी स्वामी बुध हा आहे. पृथ्वी चिकित्सक असतात. आपल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण विचार करून निर्णय घेता. कामाच्या ठिकाणी नियोजन करणे सुसुत्रता आणणे हे गुण आपणात असतात.

चालणे, बोलणे, तोलून, मापून असते. विचारात बालिशपणा विचारांचा थांगपत्ता न लागणे, लाजाळू, भित्रा, आळसी, चिकित्सक, आत्मविश्‍वास कमी असणे, हेवा करणारी, भावनेच्या भरात वाहत जाणारी, आतल्या गाठची आपण अगोदर इतरांची मते जाणून घेता. मात्र आपल्या मनाचा थांगपत्ता आपण सहसा इतरांना लागू देत नाही.

मुत्सद्दीपणा हा गुण असलेल्या व्यक्ती या राशीत आढळतात. कोणत्याही राशीत आढळतात. कोणत्याही विषय आपल्याला अवघड नसतो कोणत्याही कामात भावनेच्या भरात झोकून देण्याचा आपला स्वभाव नाही.

आपल्याकडे हजर जबाबीपणा, वाक्य चातुर्य, दूर दर्शीपणा हे गुण निसर्गत आहेत. आपल्यालमध्ये धडाडी, शौर्य, पराक्रम व धाडस ह्या गोष्टीचा अभाव असतो. त्यामुळे आपण नेतृत्वपेक्षा पडद्यामागून काम करणे अधिक पसंत असते.

आपले निरीक्षण चौफेर, व खोलवर असते. मात्र प्रत्येक गोष्टीचा सुक्ष्मपणे आपण विचार करता प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मपणे आपण विचार करता. इतरांना मार्गदर्शन करणे आपणास आवडते.आपल्यात कोमलपणा, विनयशिलता, नम्रता, संकोच, भावनावशता ही वैशिष्ट्ये असतात.

कन्या राशीच्या व्यक्तीचे एक गुण म्हणजे एक गोष्टीतून दुसर्‍या गोष्टीकडे लगेच वळतात. या राशीच्या व्यक्तीमध्ये संघर्ष कमी आढळतो. बुद्धीमत्ता हेच भांडवल शारिरीक कष्टाचा कंटाळा करणार्‍या व्यक्ती म्हणजे कन्या राशीची होय. या राशीच्या लोकांच्या प्रतिकार शक्ती कमी असते.

कन्या रास ही स्त्री वर्गाला फार अनुकूल असते. घरातील गोष्टी दुसरीकडे सांगणार नाहीत. ह्या राशीच्या स्त्रिया संयमी व विवेकी असतात. या राशीमध्ये उत्तरा हस्त व चित्रा ही नक्षत्रे येतात.

कन्या रास उत्तरा नक्षत्र असणार्‍या व्यक्तीची वैशिष्ट्ये तेजस्वी, स्वाभिमानी कलेच्या क्षेत्रामध्ये कुशल आत्मविश्‍वास व समानतेचे व्यवहार करणारी असतात. कन्या रास हस्त नक्षत्र अत्यंत उत्याही, गुढ शास्त्रज्ञची आवड असणारे, शांत प्रिय, विनम्र, विद्वान, धनिक, प्रभावशाली व्यक्तीमत्व असणारे संपदा कामी, सुंदर कपडे व दागिन्यांची हौस असते.

चैनीसाठी हे लोक निर्लज्ज होतील. तर चित्रा नक्षत्रामधील व्यक्तींना विविध वस्त्रे वापरण्याची आवड, फुलांची आवड. यांचे डोळे तजेलदार व बोलके असतात. व स्वभावात चतुरस्त्र भावाची असतात.

अशा कन्या राशीच्या स्वभावाच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू…

राशीच्या पंचम व षष्ठ स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असून या वर्षी नशीबाची साथ उत्तम राहील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल, संतती सौख्यात भर पडेल. मुलांच्या प्रगतीचा काळ उत्तम असल्यामुळे पालक वर्ग आनंदी राहील.

शेअर्स व्यवसायात मोठा पैसा मिळेल. स्पर्धा, लॉटरी यामध्ये बक्षीस मिळेल. कमी श्रमातील पैशाचा लाभ होईल. वारसा हक्क वडीलोपार्जित प्रॉपर्टीमधून मोठा लाभ होईल. धार्मिक व मंगल कार्य संपन्न होतील. तीर्थयात्रा होतील.

उच्च शिक्षणाची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य उत्तम राहील. सामाजिक कार्यात सहभाग राहील. राजकीय सामाजिक क्षेत्रात मानाचे पद मिळेल. नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी मोठ्या कर्जाची कामे सहज होतील.

शनिचे भ्रमण आपल्या पंचम स्थानातूनच जात आहे. शेअर्स व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर राहील. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय होतील. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळेल. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल. एखाद्या चिवट किंवा दीर्घकाळ असलेल्या दुखण्यावर ईलाज मिळेल. नोकरीमध्ये स्थैर्य लाभेल.

हाताखालच्या लोकांकडून सहकार्य उत्तम राहील. मात्र वैवाहिक काही प्रमाणात समाधानी राहला. आपल्या पत्रिकेत पंचम व सप्तमेश यांची युती पंचमस्थानात होत असल्यामुळे विवाह, प्रेमविवाह, प्रेमाचे रुपांतर विवाहत अशी घटना घडतील.

डोळ्यांचे अथवा दातांचे विकार या काळात डोके वर काढतील. तर राशीच्या नवम व तृतीय स्थानातून राहू व केतूचे भ्रमण होत असून या काळात गुरुजन व्यक्तीशी वादविवाद, मतभेद अशा घटना घडतील. छोटे प्रवास करताना दक्ष राहावे लागेल.

चुकीचा पत्र व्यवहार अथवा कागद पत्रे गहाळ होतील. छोटे भाऊ बहीण यांच्याशी वादविवाद दर्शवितात. गायक, साहित्यिक, लेखक यांना दक्ष राहूल काम करावे लागेल.

तर अष्टमस्थानी असणारा हर्षल, षष्ठस्थानी नेपच्यून व पंचमस्थानी येणारा प्लूटो खर्चाचे प्रमाण वाढेल, एखादे रेंगाळत असलेले काम पूर्णत्वाकडे जाईल. एकंदरीत आपणास वर्षीचा पूर्वार्ध उत्तम राहून उत्तरार्ध मध्यम राहील.

उपासना : कृष्ण, विठ्ठल, रुक्मिणी उपासना शुभ राहील. दर मंगळवारी केळी दान केल्यास शुभ राहील.

शुभ रंग : पिवळा, पांढरा

शुभरत्न : पांढरा, पुष्कराज व पाचू या रत्नांचा वापर केल्यास योग्य राहील.

शुभ दिनांक : कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23.

भाग्यकारक वयोवर्ष : 15, 25, 36, 42, 51, 60.

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.