Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मिथुन राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. मिथुन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मिथुन : आर्थिक स्थितीत मोठे बदल

राशी चक्रातील ही तिसरी रास असून वायू तत्वाची ही स्वभावी उत्तम स्मरणशक्ती असणारी बौद्धिक कामे बुद्धीचातुर्याने करणारी, संगीत, कलाक्षेत्र यामध्ये विशेष आवड असणारी सतत प्रवासाची आवड असणारी बुद्धीप्रधान रास असून वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग याबद्दल आपली ख्याती असते.

प्रसंगावधान, संयम, सूचकता, हजरजबाबी, चातुर्य, हसत हसत दुसर्‍यावर टीका करणारी व वकिलास लागणारी गुणवैशिष्ट्य आपणाकडे असतात.

अनेक भाषांवर आपले प्रभुत्व असू शकते. चर्चासत्रे, प्रवचने, वृत्तपत्रे, बौद्धिक चळवळी ही आपल्या आवडीची खरी खुरी क्षेत्र आहेत. आपल्या जीवनात विचाराचा चढ उतार असतो. आपल्याला खेळामध्ये बुद्धीवादी खेळ आवडतात.

आपण नेतृत्वाचे सल्लागार म्हणून आपणास जास्त काम करण्यास आवडते. जगात नवनवीन काय चालले आहे याचे कुतुहलाने आपण शोध घेता. साहित्य, काव्य, नाट्य या गोष्टी आपणास मनापासून आवडतात.

आपले शस्त्र म्हणजे आपले शब्द आपण आपल्या बोलण्याचा पद्धतीमुळे आपणास इतर राशीच्या व्यक्तींपेक्षा  वेगळी असते. मिथुन राशीमध्ये मृग, आद्रा, व पुनर्वसू ही नक्षत्र येतात.

मिथुन रास व मृग नक्षत्र यामध्ये व्यक्तीचा स्वभाव धार्मिक यात्रा, धनयुक्त, साहसी विवेकी वाहन व भूमी यांचा उपभोग प्राप्त करणारी व्यक्ती असते. तसेच हुशार विद्वान, गतिशील उत्साही व पराक्रमी असते.

मिथुन रास आर्द्रा नक्षत्रमधील व्यक्ती, उग्र स्वभावाची, चंचल मनाची, क्रोधी, संशयी असतात. हे लोक हिंसक, कृतघ्न स्वभावात कठोरपणा व गुढ विद्येची आवड यांची विद्या व बुद्धी तीक्ष्ण असते.

मिथुन रास पुनर्वसू नक्षत्रमधील व्यक्ती व्यवहार कुशलता, विद्वान व कोमल माणुसकी जाणारा साहित्यप्रेमी, सौम्य व संतोषयुक्त मनाचा कला कौशल्य संपन्न लोकसेवा करणारी, ईश्‍वर भक्त, गायन कलेत पारंगत अशा गुणांनी युक्त असतात.

मिथुन राशीच्या व्यक्तीचे चालू वर्षे कसे राहील ते पाहू…

मिथुन राशीच्या अष्टम स्थानी गुरु चे भ्रमण व 5 एप्रिल 2021 नंतर भाग्य स्थानी असून, आपल्या आर्थिक स्थितीमध्ये फार मोठा बदल होईल. वारसा हक्काचे प्रश्‍न मार्गी लावावे लागतील.

कुटुंबामध्ये वृद्धी व चांगल्या सुधारणा घडतील. पैशाची कामे मार्गी लागतील. मात्र मनाप्रमाणे लाभ होणार नाहीत. मित्र व ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मोठे प्रवास / विमान प्रवास घडतील. वाहन, घर, प्रॉपर्टी खरेदी होईल.

मोठे कर्ज मंजूर होईल. घरात धार्मिक व मंगल कार्य घडेल. मा़त्र या वर्षी विद्यार्थी वर्गाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. संघर्षातून परिक्षेत यश मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींना संतती बद्दल चिंता वाढेल.

शारीरिक मेहनत वाढेल. नोकरी व्यवसायात श्रम वाढतील. कष्टाने यश मिळवावे लागेल. तर अष्टम स्थानातून शनिचे भ्रमण होत असून वैवाहिक जीवनातील समस्या पासून त्रास कमी होईल. कोर्ट कचेरी व कायदेशीर कामातील समस्यांचे निराकरण आपल्या मनाप्रमाणे होईल.

पेन्शनर व व्यवसायात मनासारखे बदलल हे मे, 2021 नंतरच होतील. नवीन संधी उपलब्ध होताना जुळते घ्यावे लागेल. विद्यार्थी वर्गाला व ज्येष्ठ व्यक्तींना उशीराने अथवा शेवटच्या क्षणी चांगले यश मिळेल.

अपेक्षित ठिकाणी यश, प्रवेश व इतर कामे ही स्त्रीवर्गाकडून व ज्येष्ठ व्यक्तींकडून पूर्ण होतील. मिथुन राशीच्या व्यय व षष्ठस्थानातून राहू केतूचे भ्रमण होणार आहे. यामुळे अनावश्यक खर्च वाढतील. कर्जाचा त्रास, प्रवासात गोंधळ/ मनस्ताप होईल. प्रवासात वस्तूंची चोरी अथवा नुकसान होईल.

हिशत्रूंवर विजय प्राप्त होईल. नोकरीमध्ये बदल संभवतो. सेवा निवृत्ती अथवा नोकरीमध्ये बदली नको असल्या ठिकाणी होईल. तर हर्षलचे भ्रमण लाभातून भाग्यातून नेपच्यून व अष्टमातून प्ल्यूटो चे भ्रमण होत असून शेअर्स व्यवसायात फायदा होईल.

अचानक मोठे लाभ, वादविवादमध्ये व कोर्टकचेरीमध्ये आपली सरशी होईल. विद्यार्थी वर्गाला परिक्षेच्या वेळी सावध रहावे लागेल. ऐनवेळी गोंधळ / मनस्ताप संभवतो. मात्र उपासकांना चांगले अनुभव येतील. शुभ व सूचक स्वप्ने पडतील. एकंदरीत हे वर्ष संघर्षाचे असले तरी यश तुमचेच आहे.

उपासना : विष्णू, राधा-कृष्ण यांची उपासना केल्यास उत्तम राहील. तसेच दर गुरुवारी हरभरा डाळ व पिवळे वस्त्र व सप्त धान्य मंदिरात दान केल्यास उत्तम राहील.

शुभरंग : चमकदार पोपटी, फिकट गुलाबी.

भाग्यरत्न : पाचू हे रत्न वापरल्यास उत्तम राहील.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 5,14,23

भाग्यकारक वयोवर्षे : 17, 23, 35, 44 , 53, 62

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.