Pune Crime : उरूळी कांचन येथून गावठी हातभट्टी वरील 3 लाख रुपयांचा दारुचा साठा जप्त

एमपीसी न्यूज –  पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उरूळी कांचन येथील गावठी हातभट्टी दारुचा तब्बल तीन लाखांचा साठा जप्त केला आहे. (Pune Crime) हि कारवाई पोलिसांनी उरूळी कांचन येथील शिंदवणे काळेश्वर गाव येथे सोमवारी (दि.27) केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना उरुळी कांचन येथे येथे बेकायदेशीररित्या गावठी दारुची विक्री होत असल्याची खबर मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून 3 लाख 2 हजार 500 रुपयांची 2 हजार 750 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच 2 हजार 150 रोख रुपये असा एकूण 3 लाख 4 हजार 650 रुपयांची दारु जप्त केली आहे. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Bhosari News : शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

हि कारावाई सामाजीक सुरक्षा विभागचे गुन्हे शाखेचे(Pune Crime) वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अमित जमदाडे यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.