Bhosari News : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

एमपीसी न्यूज – शहरातील अग्रगण्य मानली जाणारी शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या (भोसरी) संचालक मंडळाच्या 13 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Bhosari News) हि निवडणूक प्रक्रिया सोमवारी (दि.27) पुण्यातील सहकारी संस्थेच्या उपनिबंधकार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए.जे. सावंत यांच्या अतंर्गत पार पडली.

Pune News : वृंदावन फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा रविवारी जनाई-मुक्ताई पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 च्या नियमानुसार संबंधित 13 जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवार उभा असल्याने इच्छुक उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Bhosari News) यामध्ये सर्व साधारण गटात गुलाब सहदेव औटी, मुकुंद दत्तात्रय आवटे, कैलास दत्तात्रय आवटे, बाळू देवराम गुंजाळ, सुहास तुकाराम गटकळ, प्रविण भगवंत गटकळ, सुर्यकांत बबन काळे, वसंत रंगनाथ कुटे यांची तर अनुसुचित जाती/जमाती गटात निंबा तुकाराम डोळस यांची निवड करण्यात आली आहे. तर विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विमुक्त मागास प्रजाती या गटातून संतोष रतिराम बिलेवार, इतर मागास वर्गातून मुबीन शब्बीर तांबोळी, महिला राखीव गटातून ज्योती गणेश हांडे व संगिता अरूण इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हे संचालक मंडळ शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर सन 2023 ते 2028 या पाच वर्षाच्या कालावधी साठी नियुक्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.