Lockdown Effect : यंदा वर्षाविहारावर कोरोनाचे काळे ढग!

Lockdown Effect: What about rainy season tourism this year? कोरोना विषाणूचा प्रसार पाहता यावर्षी पावसाळी पर्यटन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.

एमपीसी न्यूज – यंदा पावसाळ्यावर कोरोनाचे सावट आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार पाहता यावर्षी पावसाळी पर्यटन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.
 
उन्हाळ्यातील पर्यटन कोरोनाच्या सावटाखालीच निघून गेले. कोरोनाचा कहर जर पावसाळ्यात कमी झाला असता तर नागरिकांना पावसाळ्यातील पर्यटनाचा मन मुराद आनंद घेता आला असता, मात्र कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रसार पाहता यावर्षीचा पावसाळा कोरोनाच्या सावटाखालीच जाणार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी या सर्वांचा मोठा फटका हजारो व्यावसायिकांना होणार आहे.

पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग आणि धरणांचे वाहते पाणी पाहण्यासाठी नागरिक धारण परिसरात गर्दी करत असतात. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन  पालिकेने नागरिकांना धरण परिसरात जाण्यास व  गर्दी  करण्यास नागरिकांना मज्जाव आहे. लोणावळा, मावळ, मुळशी, खंडाळा, सिंहगड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिक पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक आणि इतर कामगारांना रोजगारउपलध होत होता. यावर्षी मात्र या गोष्टीना ब्रेक लहणार आहे.
या परिस्थितीत स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक आणि इतर कामगार चिंतेत आहेत. नागरिकांना सुद्धा या पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटता येणार नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.