Pimpri: दिवसभरात 68 नवीन रुग्णांची भर; 61 जणांना डिस्चार्ज

Adding 68 new patients throughout the day; Discharged 61 people

पिंपळेगुरव येथील पुरुषाचा YCMH मध्ये मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 1246 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 65 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा एकूण 68 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, पिंपळेगुरव येथील 78 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1246 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील लक्ष्मीनगर वडमुखवाडी, गुलमोहर कॉलनी -पिंपळेगुरव, निगडी, नवभारतनगर- दापोडी, बौध्दनगर- पिंपरी, भिमाशंकर नगर -दिघी, जयभीमनगर- दापोडी, श्रीकृष्ण कॉलनी -काळेवाडी, लिंबोरेवस्ती -दापोडी, पवारवस्ती- दापोडी, आदर्शनगर- दिघी,साईबाबानगर -चिंचवड,यमुनानगर, रमाबाईनगर- पिंपरी, अजंठानगर, शाहूनगर, आनंदनगर, सद्गुरुकॉलनी- वाकड,सिदार्थनगर -दापोडी, सखाराम काटेचाळ -दापोडी, वाकड, कासारवाडी, मोरवाडी, पिंपरी कॉलनी वाघेरे पार्क परिसरातील 65 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 37 पुरुष आणि 28 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय खडकी व खेड येथील तीन पुरुषांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, आनंदनगर,अजंठानगर,‍चिंचवड,बौध्दनगर पिंपरी, नवभारतनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, जुनी सांगवी, रमाबाईनगर पिंपरी, गुरुदत्तनगर पिंपरी, लालटोपीनगर मोरवाडी, दापोडी,दिघी, दळवीनगर चिंचवड, पिंपरी, आकुडी, यमुनानगर, भोसरी व सांगवी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 61 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1246 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 734 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 22 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 41 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 472 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 155

# पॉझिटीव्ह रुग्ण – 68

#निगेटीव्ह रुग्ण – 269

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 211

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 706

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 295

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1246

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 472

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 41

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 734

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23410

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 73278

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.