Pimpri : पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा; 2025 पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भाविणाऱ्या (Pimpri) मावळातील पवना 58 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. दरम्यान, 2025 पर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे. उन्हाळा सुरू होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

Pune : शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. तेव्हापासून दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत 8 हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे.

भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम 2025 पर्यंत  पूर्ण होईल. तोपर्यंत पाणीपुरवठा एकदिवसाआडच सुरू राहणार आहे. महापालिका दिवसाला पवनातून 510, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून 70 आणि एमआयडीसीकडून 15 असे 595  एमएलडी पाणी उचलते. उन्हाळा सुरू होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतून कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पाणीपुरवठा कमी वेळेत, अपुरा याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.  त्या कमी केल्या जातील,   असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी (Pimpri) सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.