Pune : प्रलंबीत मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे रास्तापेठ येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज –  विविध प्रलंबीत मागण्यासाठी राज्यभर वीज कंत्रांटी ( Pune ) कामगारांचे आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील रास्ता पेठ  येथील महावितरण कार्यालयासोमर बुधवारी (दि.21) कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले.

 

यावेळी नीलेश खरात,  राहूल बोडके,  उमेश आणेराव,  सागर पवार,  सुमीत कांबळे,  निखिल टेकवडे तसेच मोठ्या संख्येंना कामगार उपस्थित होते.अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी 9 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीज निर्मिती केंद्र व वितरण ऑफिसवर क्रम बद्ध आंदोलन सुरू आहेत.

Pimpri : पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा; 2025 पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा

 

कृती समितीच्या महत्वपूर्ण मागण्या

1 ) सर्व कंत्राटी कामगारांना 30 % वेतन वाढ देण्यात यावी. 

2 ) रानडे समिती च्या शिफारशी त्वरित लागु करून कामगारांना एन. एम.आर.माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावेत. 

3 ) नोकरीत कायम करत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार टाळण्यासाठी कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा.

4) 4 ऐवजी 15 लाख अपघात निधीकुटुंबाला 5 लाखाचा मेडिक्लेममृताच्या वारसाला नोकरी.

5) सेवा निवृत्ती च्या वेळी ग्रजुईटी मिळावी

ई अन्य महत्वपूर्ण मागण्या आहेत. 

 

या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास दि 5 मार्च 2024 पासून राज्यातील सर्व कामगार “बेमुदत काम बंद ” आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 चे राज्य संघटक सचिन मेंगाळे व निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी ( Pune ) दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.