Loksabha Election 2024 : दोन टप्प्यातील निवडणुका आणि दुबार मतदान हे प्रशासनासमोर मोठे आव्हान

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ येतात. त्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील ( Loksabha Election 2024) मतदान 7 मे रोजी तर उर्वरित तीन मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. दोन टप्प्यात होणारी मतदान प्रक्रिया आणि त्यातील दुबार मतदान हे प्रशासना समोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाला वेगळे महत्त्व आले आहे. पहिल्या टप्प्यात तिथे निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा जोर या मतदारसंघात लागणार आहे.

Loksabha Election 2024 : 44 हजार ईव्हीएम मशीनचे चार लोकसभा मतदार संघात होणार वाटप

निवडणूक आयोगाने मध्यंतरी मतदार नोंदणी मोहीम राबवली. या मोहिमेत बारामती मतदारसंघातील दुबार मतदारांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. एका माजी आमदारांनी याची यादी प्रशासनाकडे सादर केली होती. ही नावे वगळण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. प्रशासनाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन विशेष मोहीम राबवत दुबार मतदारांची नावे कमी केली. दुबार मतदारांसोबतच बोगस मतदान होणार नाही याचीही प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, “मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. काही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जे दुबार मतदार आहेत त्यांना नोटीस देऊन एकाच ठिकाणी नाव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही दुबार नावे असतील तर ती त्या विधानसभा निवडणुकीतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. दुबार मतदान ( Loksabha Election 2024) होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.