Loksabha Election 2024 : 44 हजार ईव्हीएम मशीनचे चार लोकसभा मतदार संघात होणार वाटप

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार ( Loksabha Election 2024)  लोकसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 44 हजार ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तिथे तपासणी केल्यानंतर या मशीन प्रत्येक मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम मध्ये पाठवण्यात येणार आहेत. सध्या कोरेगाव पार्क येथील गोदामा बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. मशीन वाटप केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम मध्ये देखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या सुमारे 44 हजार ईव्हीएमची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे. कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवलेल्या मशीनच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांच्या मतदानासाठी महत्त्वाचे असलेल्या ईव्हीएम निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या मशीन नवीन आहेत. ईव्हीएम मध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहे.

Pimpri : आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राजकीय पक्षांचे फ्लेक्‍स काढण्यास सुरूवात

कोरेगाव पार्क येथील गोदामातून या मशीन लवकरच पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जाणार आहेत. ईव्हीएम स्थलांतर करताना आवश्यक पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस ट्रॅकर बसवला जाणार आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी एफसीआय गोदाम कोरेगाव पार्क पुणे येथे स्ट्रॉंग रूम बनविण्यात आली आहे. बारामतीसाठी देखील याच परिसरातील गोदामात स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे. मावळ लोकसभेसाठी बालेवाडी स्टेडियम तर शिरूर लोकसभेसाठी वखार महामंडळाचे गोदाम रांजणगाव (कारेगाव) एमआयडीसी, ता. शिरूर येथे स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात 8 हजार 382 मतदान केंद्र आहेत. त्यासाठी 20 हजार 117 बॅलेट युनिट, 10 हजार 59 कंट्रोल युनिट आणि दहा हजार 897 व्हीव्हीपॅट अशी निवडणूक विभागाने तयारी केली ( Loksabha Election 2024)  आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.