Lonavala : शिवसेनेच्या रक्तदान शिबिरात 92 जणांचा सहभाग

0

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर शिवसेना व शिवसेना कुसगाव वरसोली विभाग यांच्या वतीने व अमृत ब्लड बॅकेच्या सहयोगाने वरसोली येथे आयोजित रक्तदान शिबिरात आज 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर ‘मी शिवसैनिक, मी रक्तदाता’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत हे शिबिर घेण्यात आले होते.

खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, महिला आघाडी जिल्हा संघटक शादान चौधरी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमुख, मदन शेडगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपतालुका प्रमुख गबळू ठोंबरे, नगरसेवक शिवदास पिल्ले, सुभाष डेनकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like