Lonavala : लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

एमपीसी न्यूज -लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो (Lonavala) झाले आहे. लोणावळा व खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.  येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे.

धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्‍या पाण्यात बसून वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येत असतात. धरणाच्या सांडव्याला लागून पायर्‍या असून या पायर्‍यांवरुन धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वहात असते.

लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले की खर्‍या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात होते. अनेक देश विदेशातील पर्यटक धरणाच्या पायर्‍यांवर बसण्याचा व या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

30 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भुशी धरण ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. कारण पावसाळी सिझनच्या चार महिने व्यावसायावर येथील नागरिकांचे वार्षीक अर्थचक्र अवलंबून असते. शनिवारी सकाळीच धरण भरल्याची  बातमी समजल्याने शनिवार व रविवार दोन्ही दिवस धरणावर पर्यटकांची गर्दी होण्याची (Lonavala) शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.