Lonavala : कोरोना; श्रीराम मंडळाच्या वतीने गरजू नागरिकांना खिचडी भाताचे वाटप

एमपीसी न्यूज : कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर 31 मार्च पर्यत बंद ठेवण्यात आले आहे. दुकाने, हाॅटेल, रेस्टाॅरंट, टपर्‍या बंद असल्याने सर्वसामान्य व गरजू लोकांची जेवणाकरिता होणारी गैरसोय दूर करण्याच्या हेतूने श्रीराम मंडळ व गवळीवाडा ग्रामस्तांच्या वतीने खिचडी भात वाटपाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

कोरोनामुळे जितके दिवस बाजारपेठ व हाॅटेल बंद राहतील तितके दिवस हा उपक्रम सुरु राहिल, असे नगरसेवक निखिल कविश्वर यांनी सांगितले. कोरोना या आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता लोणावळा शहरातील सर्व व्यवहार 31 मार्चपर्यत बंद ठेवण्यात आले आहेत. लोणावळा शहरात अनेक नागरिक हे पोटाची खळगी भरण्याकरिता येत असतात.

या नागरिकांची जेवणाकरिता होणारी गैरसोय टाळण्याकरिता सदरचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात जेवणाच्या वेळेस गर्दी होऊ नये याची दखल घेण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार करिता त्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच गवळीवाडा परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.