BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची पुणे लेन दोन तासाकरिता बंद

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पनवेल भागातील पुणे लेनवर किमी 17/695 व किमी 23/870 याठिकाणी ओव्हरहेड ग्रॅन्ट्रीज उभारण्याचे काम आज, गुरुवारी दुपारी करण्यात येणार आहे.याकामाकरिता दुपारी बारा ते दोन या कालावधीत द्रुतगती मार्गाची पुणे लेन बंद करण्यात येणार आहे.

वाहनचालकांची व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता पुण्याकडे येणारी वाहतूक रसायनी ते मांडप दरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहे. दरम्यान वाहतुकीची समस्या येऊ नये याकरिता रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदार यांनी वेळेत काम पूर्ण करावे तसेच खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी सूचना पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.