MPC News Online Bappa : एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका चांदीची नाणी!

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे.

bappa.mpcnews@gmail.कॉम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.