Lonavala : आंतरराष्ट्रीय योगा स्पोर्टस‍ कप चँम्पियनशिप स्पर्धेत सोहानी सिंन्हाचा सहावा क्रमांक

महाराष्ट्रातून सोहानी एकमेव खेळाडू

एमपीसी न्यूज- करनाळ हरियाणा याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय योगा स्पोर्टस कप व चँम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्‍या सोहानी सिंन्हा ह्या लोणावळ्यातील कन्येचा सहावा क्रमांक आला.

योगा स्पोर्टस फाऊंडेशन इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतासह पेरु, फ्रान्स, मेक्सिको, इराण, पॅलेस्टाईन, विएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मलेशिया, पोर्तुगाल, म्यानमार, सिंगापुर आदी 14 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील 15 राज्यातील खेळाडूंनी स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. स्पर्धेत भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक आला तर इराणचा दुसरा व पेरु देशाने तिसरा क्रमांक मिळविला.

सोहानी सिन्हा ही लोणावळ्यातील आँक्झिलियम काँन्व्हेंट महाविद्यालयातील इयत्ता बारावीची विद्यार्थ्यांनी असून ती 17 वर्षांची आहे. मागील वर्षापासून अफजल कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आँक्झिलियम शाळेत मुलींकरिता योगाचे कोर्सेस सुरु झाले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सोहानी अँडव्हान्स योगाचे प्रशिक्षण घेत आहे.

अफजल कादरी हे देखील वाकसई या लहानशा गावातील असून ते राष्ट्रीय योगा स्पोर्टस कोच तसेच योगा स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाचे व अे.के. योगा हेल्थ अँन्ड फिटनेस सेंटरचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय योगा स्पोर्टस व चँम्पियनशिप स्पर्धेत ते एकमेव भारतीय कोच होते. सोहानी यांच्या यशाचे व अफजल यांच्या कोचिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2020 साली होणार्‍या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेकरिता लोणावळ्यातून किमान 30 मुले व मुली सहभागी करण्याचा मानस अफजल यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.