Lonavala Lockdown: शहरातील गटई कामगारांवर उपासमारीची वेळ

Lonavala Lockdown: Time of starvation on workers making and repairing shoes and slippers

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या गटई कामगारांना बसला आहे. बाजाराभागात अथवा रस्त्याच्या कडेला तुटलेल्या चप्पला, बुट दुरुस्ती काम करणे, नवीन चप्पला बनविणे ही कामे करून कुटुंबाची उपजिविका करणाऱ्या गटई कामगारांचे हातचे काम लाॅकडाऊनमुळे बंद झाले आहे. 

शासनाच्या वतीने गटई कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्याचबरोबर त्यांना त्यांची दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी संत रविदास युवा फाउंडेशनने केली आहे.

महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष  दत्तात्रय कदम, महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागार दिनेश जाधव यांनी यासंदर्भात शासनाकडे मागणी केली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश शिंदे, ज्ञानदेव कदम, दत्तात्रय शिंदे, अमोल शिंदे, किशोर जाधव, अमोल मानकर, निवृत्ती शिंदे, रोहित पटेकर, उमेश पटेकर, प्रदीप तिखे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.