Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 327 जणांवर कारवाई

Pimpri Chinchwad police take action against 327 others

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि.24) 327  जणांवर कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे. 31 मे पर्यंत देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (39), भोसरी (8), पिंपरी (18), चिंचवड (40), निगडी (20), आळंदी (10), चाकण (5), दिघी (19), म्हाळुंगे चौकी (7), सांगवी (59), वाकड (51), हिंजवडी (13), देहूरोड (7), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (7), चिखली (17), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0) एकूण 327 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.