Talegaon Dabhade : मावळातील सलून चालकांनी मानले मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार

Salon operators in Maval thanked Chief Minister Thackeray

एमपीसीन्यूज – दोन महिने बंद असलेली केशकर्तनालये (सलून) आणि ब्यूटी पार्लरस नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिल्याने मावळातील सलून चालकांनी आणि ब्यूटी पार्लरस भगिनींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले आहे.

मावळ ब्यूटी पार्लरस संघटनेच्या संस्थापक सविता सुराणा यांनी आभार व अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. नाभिक संघटनेने राज्य शासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले असून तळेगाव शहर नाभिक संघाने याकामी सर्व नियम पाळून सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे.

तळेगाव दाभाडे व परिसरातील नाभिक संघाकडून नुकतीच दुकाने चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. शासनाने २२ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार सदर दुकाने चालविण्याची परवानगी कोरोना संक्रमणाच्या नियमास अधीन राहून सुरु करण्याचे निर्देश दिले.

या निर्णयानुसार मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी नाभिक संघास योग्य सूचना देऊन दुकाने चालू करण्याची परवानगी दिली.

ही दुकाने हि २२ मार्चपासून बंद होती. त्यामुळे त्यावर अवलंबून असणा-या नाभिक समाज बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.

तळेगाव दाभाडे, स्टेशन, माळवाडी या भागात 110 सलूनची दुकाने आहेत. त्यावर 350 कारागीर अवलंबून आहेत.

ही दुकाने सुरु केल्याने या ठिकाणी काम करताना सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यामध्ये सोशल डीस्टन, सँनेटराईजचा वापर, व वेळेत चालू व बंद करणे आदि नियम पाळले जाणार असल्याचे तळेगाव दाभाडे शहर नाभिक संघाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.