Lonavala: सिंहगड महाविद्यालयातील संगणकशास्त्रावरील वेबिनारमध्ये 352 प्राध्यापकांचा सहभाग

Lonavala: Participation of 352 professors in computer science webinar at Sinhagad College

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी मधील संगणक विभागाकडून स्पोकन ट्युटोरिअल आय.आय.टी. मुंबई यांच्या सहयोगातून सह दिवसीय प्राध्यापक कौशल्य विकास शिबीर पार पडले. लाॅकडाऊन असल्याने आँनलाईन पध्दतीने हे शिबिर घेण्यात आले होते.

सध्या जगभरात सर्वत्र कोरोना कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन पाळले जात आहे. सर्वत्र संचारबंदी असल्या कारणामुळे देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीमुळे घर बसल्या वेळेचा सदुपयोग व्हावा व शिक्षकांना आधुनिक कौशल्य व ज्ञान यांची ओळख व्हावी म्हणून सिंहगड शैक्षणिक संकुल लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील संगणक  विभागाकडून, स्पोकन ट्युटोरिअल आय.आय.टी. मुंबई यांच्या सहयोगातून सहा दिवसीय प्राध्यापक कौशल्य विकास शिबीर आयोजित केले होते .

या शिबिरासाठी भारतातून 352 प्राध्यापकांनी नाव नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ‘ पायथॉन ‘ 3.4.3 या नवीन तंत्रज्ञानावर आधारित कार्यप्रणालीचा अभ्यास केला. सध्याच्या काळातील अत्यंत महत्वाचे व भविष्यातील संधी आणि वापर या करीता पायथॉन 3.4.3 फार उपयोगी आहे. ऑनलाईन शिबिरात सहभागी झालेल्या सर्व प्राध्यपकांना याचा निश्चित फायदा होऊन ते विध्यार्थांपर्यंत पोहचेल असा विश्वास शिबिरातील सर्व प्राध्यापकांनी व्यक्त केला.

सदर ऑनलाईन शिबिराला प्राचार्य व संकुल संचालक प्रा.डॉ .एम. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा .डॉ सचिन बाबर, ऑनलाईन प्राध्यापक कौशल्य विकास शिबिराचे संयोजक प्रा.डॉ .मनोहर चौधरी हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.