Lonavala : पोलिसांच्या सर्तकतेने हत्यार बाळगणारा संशयित अटकेत

एमपीसी न्यूज – रविवारच्या गर्दीत घातक हत्यार जवळ बाळगत भुशी धरणाकडे निघालेल्या संशयित युवकाला लोणावळा शहर पोलिसांच्या सर्तकतेमुळे हत्यारासह अटक करण्यात आली आहे.

आकाश सुभाष खेत्रे (वय 23, रा. यशवंतनगर, कुसगाववाडी लोणावळा) असे हत्यारासह अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तर, त्याच्या सोबत असलेला शंतनू राजेंद्र लाड (वय 20) आणि कमलेश हुसेन कांबळे (वय 22 दोघेही राहणार कुसगाव, लोणावळा) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

  • लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भुशी धरण आणि मार्गावर पर्यटकांची गर्दी होती. पावसाचा जोर देखील जास्त असल्याने सहारा पुल आणि धरण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी तीन तरुण दुचाकी (एमएच 14 एचएल 8490) वरुन संशयास्पद जात असताना त्यांना पोलीस नाईक संदीप शिंदे यांनी सहारा पुलावर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पलायन करण्याच्या तयार असताना त्याना पकडण्यात आले. त्यांची अंग झडती घेतली असता आकाश याने पॅन्टमध्ये खोचून ठेवलेली तलवार मिळून आली.

त्याच्यावर आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तलवार घेऊन भुशी धरणाकडे कशाकरिता निघाला होता? याचा तपास पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.