Lonavala : शेतकरी भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश पाळेकर

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील मानाचा पाचवा गणपती असलेल्या वलवण गावातील शेतकरी भजनी मंडळ या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी रमेश पांडूरंग पाळेकर यांची निवड करण्यात आली.

शेतकरी भजनी मंडळाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे 81 वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरिता गणेश उत्सव काळात दररोज एका समाजाच्या वतीने आरतीचे आयोजन केले आहे. या व्यतिरिक्त महिलांचे भजन, अथर्वशीर्ष व हळदीकुंकु, सत्यनारायण महापुजा याचे आयोजन केले आहे. उत्सव काळात गावात स्वच्छता मोहिम राबवत स्वच्छ लोणावळा हा संदेश देखिल मंडळाचे कार्यकर्ते देणार असल्याचे अध्यक्ष रमेश पाळेकर यांनी सांगितले.

शेतकरी भजनी मंडळाची कार्यकारिणी

दीपक राक्षे व गणेश शेलार (उपाध्यक्ष), बाबा बोडके (खजिनदार), शेखर खिल्लारे (सहखजिनदार), विनायक आंबेकर (सचिव), युवराज इंगूळकर (सहसचिव)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.